वेळेची किंमत न करणारे यशापासून दुर ....

वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग होत नाही, हे शब्द आपण वारंवार एकतो पण हे गांभीर्याने घेत नाही, आपल्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर ते म्हणजे वेळ, पैसा पुन्हा मिळवता येतो, संधी पुन्हा येतात पण वेळे एकदा गेली कि ती परत येत नाही. वेळेचे महत्व प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात आपण बघू शकतो. तुमच्यासाठी तुमचे आई बाप आणि भाऊ खूप कष्ट घेतात याची जाणीव ठेवून चला. 1) वेळ कसा वाया जातो * मोबाईल आणि सोशल मीडियावर अति वेळ घालवणे, हे ऐकायला तुम्हाला बोरिंग वाटतंय पण जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येते की आता आयुष्यामध्ये काय करावे, वेळेअभावी निघून गेलेल्या संधी आपल्याला मोबाईल किंवा इंस्टाग्राम बघू देत नाही * आपण विचार करतो दहा मिनिटे इंस्टाग्राम बघू, पाच मिनिटे youtube बघू पण बघता बघता तासान तास यामध्ये कसे निघून जातात कळतही नाही, यामध्येच आपला पूर्ण दिवस संपून जातो मग आपल्याला लक्षात येते की आपण आपला अभ्यास व महत्त्वाचं काम होतं ते केलंच नाही. 2) नवीन सुरुवात नेहमी उद्यावर ढकलतो * उद्यापासून पक्का अभ्यास सुरू करतो हे वाक्य अनेकांनी दिनचर्या झाली आहे पण तो उद्या ...