ध्येय ठरवा, दिशा मिळवा: MPSC विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन"
ध्येय म्हणजे आपल्या आयुष्यातील ठरवलेली एखादी दिशा, ज्याकडे आपण प्रयत्न पूर्ण वाटचाल करतो , कोणत्यही यशस्वी जीवन हे स्पष्ट आणि ठोस ध्येय शिवाय शक्य नाही, मग ते एमपीएससी यूपीएससी किंवा इतर कुठल्याही परीक्षा असो एखाद्या व्यवसाय उद्योग असून किंवा फिटनेस गोल असो, योग्य पद्धतीने ध्येय निश्चित केल्याशिवाय यशाच्या जवळ जाता येत नाही, या ब्लॉगमध्ये आपण काही प्रभावी गोल सेटिंग बघणार आहोत, जर तुमच्या आयुष्याल दिशा देणारे ठरले.
1) स्मार्ट त पद्धतीने ध्येय ठरवा -
स्मार्ट म्हणजे
S) specific (विशिष्ट) ध्येय : अचूक व स्पष्ट असावे उदाहरण माझं वजन कमी करायचा आहे या ऐवजी तीन महिन्यात पाच किलो वजन कमी करायचा आहे अधिक प्रभावी ठरेल.
M) Measurable (मोजता येईल) : ध्येय मोजता येईल असं ठेवा म्हणजे प्रगती लक्षात येते .
A) Achievable (साध्य करता येईल असा) : अतिशय अवास्तव ध्येयमुळे निराशा येते .
R) Relevant (सुसंगत) : ध्येय तुमच्या जीवनातील मोठ्या उद्दिष्टशी सुसंगत असावे .
T) Time - Bound (वेळ निश्चित असलेल) : एखादा अंतिम टारगेट असेल तर प्रयत्न अधिक ठाम होतात .
2) vision Board - तुमचं ध्येय नेहमी समोर ठेवा, विजन बोर्ड म्हणजे तुमच्या ध्येयाचा एक विज्युअल स्वरूप फोटोद्वारे, कागदाद्वारे, डिजिटल स्वरूपात दररोज सकाळी हे बघितल्याने मन ध्येयावर केंद्रित केंद्रित राहत.
3) लेखी ध्येय ठेवा ( write it down)
मनातलं मनात ध्येय ठेवण्यापेक्षा ते लिहून ठेवा संशोधनानुसार जे लोक ध्येय लिहून ठेवतात त्यांना यश मिळण्यासाठी शक्यता 42% अधिक असते, एक डायरी नोंदवही ठेवा ज्यामध्ये तुमचं ध्येय टाईम लाईन आणि प्रगती लिहा.
R
4) मोठा ध्येय छोटे टप्प्यात विभागा (break down big goals)
उदाहरणार्थ; जर तुमचं ध्येय एमपीएससी परीक्षा पास करायचा असेल तर ते अशा छोट्या टप्प्यात विभागा,अभ्यासक्रम समजून, घेणे वेळापत्रक बनवणे, रोज पाच तास अभ्यास करणे , सहा महिन्याला एक मॉक टेस्ट सहा महिन्यात प्राथमिक तयारी पूर्ण करणे,
5) Accountability Partner ठेवा
तुमचे ध्येयाची जबाबदारी कुणाशी शेअर करा तो मित्र किंवा भाऊ, शिक्षक किंवा परिवारांचे कोणीही असो जेव्हा कोणी तुमची प्रगती विचारतो तेव्हा शिस्त जास्त टिकते.
6) Procrastination टाळा -कृतीवर भर द्या
ध्येय निश्चिती पेक्षा कृती अधिक महत्त्वाचे असते, परवा सुरू करतो असे म्हणत राहिलं तर ध्येय फक्त स्वप्नातच राहतात, पत्येक दिवशी एक पाऊल पुढे टाका.
7) नियमित पुनरावलोकन (Review & Adjust)
आठवड्यातून एकदा स्वतःकडे मागे वळून बघा,मी काय साध्य केले काय घडलं, आणि त्याप्रमाणे प्लानमध्ये बदल करा ध्येय कठोर असावा पण मार्ग लवचिक असावा.
8) Self motivation आणि सकारात्मक विचार
ध्येयापर्यंत पोहोचताना खूप अडथळे येतील, त्यामुळे स्वतःला दररोज प्रेरणा देणं गरजेचं आहे, प्रेरणादायी पुस्तके वाचा, यशस्वी लोकांचे अनुभव ऐका, मनात मी करू शकतो ही भावना ठेवा
निष्कर्ष :
ध्येय निश्चित करणे ही यशाची पहिली पायरी आहे, योग्य पद्धतीने स्मार्ट टेक्निक वापरून नोंद ठेवून आणि कृतीवर भर देऊन आपण कोणतीही ध्येय साध्य करू शकतो, आपल्या जीवनात प्रत्यक्ष क्षण महत्त्वाचा आहे त्यामुळे आज पासून आपल्या ध्येयाचा क्षण म्हणजे काय प्रवास सुरू करा
www.motivationalaai.blogspot.com

Comments