वेळेची किंमत न करणारे यशापासून दुर ....

 वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग होत नाही, हे शब्द आपण वारंवार एकतो पण हे गांभीर्याने घेत नाही,


आपल्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर ते म्हणजे वेळ, पैसा पुन्हा मिळवता येतो, संधी पुन्हा येतात पण वेळे एकदा गेली कि ती परत येत नाही. वेळेचे महत्व प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात आपण बघू शकतो. 
तुमच्यासाठी तुमचे आई बाप आणि भाऊ खूप कष्ट घेतात याची जाणीव ठेवून चला. 

1) वेळ कसा वाया जातो

* मोबाईल आणि सोशल मीडियावर अति वेळ घालवणे, हे ऐकायला तुम्हाला बोरिंग वाटतंय पण जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येते की आता आयुष्यामध्ये काय करावे, वेळेअभावी निघून गेलेल्या संधी आपल्याला मोबाईल किंवा इंस्टाग्राम बघू देत नाही 

* आपण विचार करतो दहा मिनिटे इंस्टाग्राम बघू, पाच मिनिटे youtube बघू पण बघता बघता तासान तास यामध्ये कसे निघून जातात कळतही नाही, यामध्येच आपला पूर्ण दिवस संपून जातो मग आपल्याला लक्षात येते की आपण आपला अभ्यास व महत्त्वाचं काम होतं ते केलंच नाही.

2) नवीन सुरुवात नेहमी उद्यावर ढकलतो

* उद्यापासून पक्का अभ्यास सुरू करतो हे वाक्य अनेकांनी दिनचर्या झाली आहे पण तो उद्या कधीच येत नाही, असं का होत असेल कधी असा विचार केलाय? नाही ना !

3) सतत इतरांशी तुलना करत वेळ वाया घालवणे

* एखादा मित्र जास्त शिकतोय दुसरा प्रगती करतोय आपण केवळ त्यांना बघून चिंता करतो पण स्वतः काही करत नाही 
 

4) मित्रांशी गप्पा मारणे वेब सिरीज बघणे गेम खेळणे यावर वेळ वाया घालणार 

* हे क्षणिक सुख आहे मित्रा यामध्ये दीर्घकाळ नुकसान लपलेला आहे

* वेळ वाया जाणारं प्रत्येक क्षणी काय गमावतो 

* आपले स्वतःचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी होते 

*  स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो 

*  गुन्हेगारी आणि चुकीच्या सवयीं मध्ये अडकण्याची शक्यता वाढते

* घरच्यांवर आणि इतरांवर अवलंबून राहण्याची कृती निर्माण होते

* घरच्यांचा विश्वास तुटतो

& वेळेचा योग्य वापर कसा करावा आणि आयुष्य कसं करावं 

* हे सर्वांना माहित आहे पण तरी कोणाला करायचे नाही, पण लक्षात ठेवा स्वतःसाठी नाही तर घरच्यांसाठी तरी करा

* दररोजचा शेडूल बनवा 

1) मोबाईलचा वापर मर्यादित करा सोशल मीडियासाठी ठराविक वेळ द्या ॲप्स मध स्क्रीन टाइमिंग लिमिट सेट करा.

2) महत्त्वाचे काम सर्वात अगोदर करा, जे काम  महत्त्वाचे असते त्याला आपण अगोदर प्राधान्य दिले पाहिजे नंतर छोट्या कामाकडे लक्ष द्या.

3) सेल्फ रिव्ह्यू रोज करा, दिवसभरात काय शिकलात, ते लिहून ठेवा यामुळे दुसऱ्या दिवशी सुधारणा शक्य होते. 

4) सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाही म्हणायला शिका, मित्र पार्टीसाठी बोलावतात, फिरायचा आग्रह करतात पण तुम्हाला जर वाटत असेल की आपला अभ्यास अपूर्ण राहिला आहे, आपल्याला अगोदर तो कंप्लेंट करायचा आहे तर सरळ नाही म्हणायला शिका, याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि यशस्वी मार्ग मोकळा होतो. 

" वेळ ही अशी गोष्ट आहे कि ती साठवता येत नाही ती वापरायला हवी"

" जो व्यक्ती वेळ वाया घालवतो तो आयुष्याची संधी गमावतो, 
सक्सेस आणि फेलियर या मधला फरक वेळेचा वापर ठरवतो,

* जगातला सर्वात बुद्धिमान व्यक्ती जर वेळ वाया घालवत असेल तर तोही अपयशी ठरवू शकतो, वेळेचा योग्य वापर तुमचं भविष्य ठरवतो तुम्ही एमपीएससी किंवा इतर कोणतेही स्पर्धा परीक्षा देत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेव वेळ ही सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे, 

* आजपासून ठरवा *
मी वेळ वाया घालणार नाही प्रत्येक क्षणात माझं भविष्य उभ करेल 
Thank you 

Website - www.motivationalaai.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

ऑटो ड्राइवर की बेटी प्रेमा जयकुमार बनी चार्टर अकाउंटन

पनीर प्लांट बिजनेस की शुरवात कैसे करे

चिंता में डूबे हुए लोग जरूर पढ़े