MPSC करणाऱ्या विद्यार्थी यांचा आत्मविश्वास कमी होत असल्यास? 7 उपाय

 कुठले ही काम करण्यासाठी गरजेचं असते ते आत्मविश्वास आणि प्रेरणा(motivation) खास करून जेव्हा तूम्ही mpsc करता



1) स्वतःला एक मिनट द्या- ठरवा कि तुम्ही का सुरुवात केली ? 

* जेव्हा तुमचं मन हरा याला लागते, आणि तुम्हाला असं वाटते की तुम्ही काही करू शकणार नाही, तेव्हा स्वतःला विचारा तुमचं ध्येय काय ? तूम्ही का mpsc स्पर्धा परीक्षा का निवडली (ulitmate goal) काय आहे? तूम्ही जेव्हा या विचारांच्या दिशेने जाल, तेव्हा तुमचं मन ताज होईल, आणि तुम्हाला एक नवी प्रेरणा ( motivation ) मिळेल, स्वतःला विचारून बघा हे "स्वप्नं तुमचंच आहे का" मी यासाठी तयार आहे का? त्यामुळे तुमचा आत्मविश्वास जागी होईल .

2) कृती करा - लहान का होईना आणि न थांबता

* Motivation पाहिजे असल्यास फक्त छोटे छोटे प्रयत्न करा,दिवसाची सुरूवात जरी दमट, उदास वाटत असेल तरी देखील उठून जोमाने अभ्यासाला लागा, 25 मिनिट अभ्यास करा आणि 5 मिनिट गाणी ऐका,हे लहान लहान पाऊल तुमचा आत्मविश्वास वाढवेल, प्रत्येक छोटा प्रयत्न मोठा परिणाम देईल हे लक्षात ठेवा.

3) तुमचा टाइमटेबल पुन्हा बनवा 

* कधी कधी असं होतं की, वेळापत्रक बिघडले ल असतं ते रचून त्यात सुधारणा करावं, तुमच्या परीक्षेचा अभ्यास कसा कऱ्याला पाहिजे याची स्पष्ट योजना तयार करा, यामुळे तुमचं मन शांत राहील

4) सोशल मीडिया पासून विश्रांती घ्या 

* सोशल मीडिया हे मुख्य कारण आहे, आत्मविश्वास कमी होण्याच ! कारण आपण जी नकारात्मक लोकाच्या पोस्ट बघतो आणि त्याच्या जागेवर स्वतःला ठेऊन उदास होतो हे अगोदर थांबल पाहिजे, आपला त्यांच्या आयुष्याशी काहीही संबंध नसताना आपण दुखत जातो , लोकांचं यश आणि अपयश हा आपला मार्ग नाहीच हे, त्यांना त्यांचा काम करू द्या आपण आपल काम करा, तुमचं लक्ष एकट्या पद्धतीने साधा, सोशल मीडियाचा वापर तुमच्या अभ्यासासाठी करा.

5) व्यायाम , योग्य आहार आणि आराम

* तुमच्या शरीराची आणि मनाची ऊर्जा वाढवण्यासाठी, प्रत्येक दिवसाला दहा मिनिटे चांगले, तुमच शरीर चांगल तर तुमच मन चांगल, दहा मिनिटे motivation करणे, संतुलित आहार योग्य झोप तरच तुमचं मन हे उत्साहित राहील.

6) स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवणे 

* आपण जसे विचार करतो, तसे आपल्या विचाराचे परिणाम आपल्या जीवनावर होतात, जर तुमचे विचार नकारात्मक असतील तर तुमचा आत्मविश्वास कमी होईल, तुम्ही विचारांवर नियंत्रण ठेवा सकारात्मक विचार करा, मी सक्षम आहे माझे ध्येय मी साधणार च , असे विचार तुमचा आत्मविश्वास वाढवेल .

7) तुमच्या परीक्षेचा निकाल मनाविरुद्ध जरी आला तरी नाराज नका होऊ

* एखाद्या परीक्षेचे मार्क्स कमी आल्यावर त्याचा जास्ती विचार करू नका, प्रत्येक पराभव हा शिकवण्यासाठी येत असतो त्याला घाबरु नाही, हाच खरा यशाचा मार्ग आहे.

टीप - motivation कमी होणं हे नॉर्मल गोष्ट आहे, त्याचा सामना करायला शिका ना की त्याला घाबरायला, हाच मार्ग एक दिवस तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नेऊन ठेवले
www.motivationalaai.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

किसीने बड़ी कमला कि बात कहीं हैं,जबतक सफलता नहीं मिलती हार नहीं मानना नही चाइए,

आईच्या अश्रूंना उत्तर मिळालं, मुलगा बनला अधिकारी

"एक वेळ असते , तूम्ही अभ्यास करता अस सांगता, लोक तुम्हाला......